Thursday, July 6, 2017

प्रॅक्टिकल पार्लेकर

काही पार्लेकरांना पर्यावरणाची काळजी असते तेवढेच अनेक प्रॅक्टिकल प्रॉब्लेमही येतात. 

बाहेर पडताना पिशवी घेऊन जाणे विसरणे त्यातील एक.  असे नेमके चॅम्पियन समोरच्या भैयाकडे जाताना घडते...सकाळी फिरायला जात असताना घडत नाही.  कारण येताना कुंपणाआड असलेली फुले गोळा करताना मोफत पिशवी हक्काने मागता येत नाही.

घरातली व्यवस्था काम करणाऱ्या बाई किव्वा मामा बघतात. त्यामुळे कचर्‍याचे वर्गीकरण होऊ शकत नाही. त्याना समजावणे फारच कठीण वाटते. तरी हेच लोक साहेबांना जूस आणि मनूसाठी पापलेट कसा आवडतो हे शिकू शकतात. नवल नाही का?

पार्ल्यात जागेची टंचाई आणि महागाई.  मग दोन डब्यांचा खर्च करणार कसा? दोन डबे ठेवणार कुठे? पण कार ही जीवनावश्यक वस्तू असल्याने कर्ज काढून ...जागा करून प्रत्येकासाठी एक नग असते.

वास येतो. अस्वच्छता. उंदीर- घुशी येतील म्हणून आपल्या आवारात खत प्रकल्प नको. पण रोज आंघोळ न करून डियोडेरंट वापरणे. रस्त्यावर बिचार्‍या पक्षी प्राण्यांना शेव बिस्किटे चारा देणे. आणि दिसेल त्या पिंपळाजवल निर्माल्य टाकणे याला पर्याय नाही असे वाटते.

असे प्रॅक्टिकल पार्लेकर असल्याने कचरा व्यवस्थापन रखडणार नाही तर काय?

No comments:

Post a Comment