Wednesday, July 5, 2017

कमीत कमी एवढे करावे

पालिके कडून पार्लेकरांना प्रतिसाद न मिळाल्याने स्वच्छ पार्ले अभियान बंद करायचे का?
अजिबात नाही.  कचर्‍याचे वर्गीकरण केलेच पाहिजे.  पालिकेच्या नेहमी येणाऱ्या घंटा गाडी ला फक्त निरुपयोगी कचरा द्या.  ओला कचरा आपआपल्या घरी कंपोस्ट करा. अगदीच पर्याय नसेल तरच ओला कचरा देखिल बाहेर पाठवा.
काही झाले तरी सुका कचरा मात्र या गाडीला देऊ नये.  इथे आपण चुकतो. 3-5 दिवस सुका कचरा गोळा करून देण्यात यावे. यासाठीच पालिकेतील वेगळी गाडी आहे. सध्या याचे कंत्राट श्री गुणवंत जाधव कडे आहे. पालिकेत त्यांचा फोन नंबर मिळेल. ते आपले काम नियमित करत नाहीत हे मात्र खरे आहे. तरी फोन करुन आठवण केल्यावर येतात.
ओला सुका कचरा वेगळा करणे पुरे नाही. ते वेगळेच द्यावे लागते.  आपल्या पर्यावरणासाठी निदान एवढे तरी करू या

No comments:

Post a Comment