I feel 'clean, green and healthy' should be the mantra for environment management in Vile Parle East (VPE), Mumbai. This blog will document facts, policies and happenings related to environment in VPE. I want it to develop into a resource for civic, health and nature loving persons who are associated with VPE. I also hope to be able to, eventually form a 'common interest group', that can deliberate and act on these issues.
Friday, July 7, 2017
A box for pins
Thursday, July 6, 2017
प्रॅक्टिकल पार्लेकर
काही पार्लेकरांना पर्यावरणाची काळजी असते तेवढेच अनेक प्रॅक्टिकल प्रॉब्लेमही येतात.
बाहेर पडताना पिशवी घेऊन जाणे विसरणे त्यातील एक. असे नेमके चॅम्पियन समोरच्या भैयाकडे जाताना घडते...सकाळी फिरायला जात असताना घडत नाही. कारण येताना कुंपणाआड असलेली फुले गोळा करताना मोफत पिशवी हक्काने मागता येत नाही.
घरातली व्यवस्था काम करणाऱ्या बाई किव्वा मामा बघतात. त्यामुळे कचर्याचे वर्गीकरण होऊ शकत नाही. त्याना समजावणे फारच कठीण वाटते. तरी हेच लोक साहेबांना जूस आणि मनूसाठी पापलेट कसा आवडतो हे शिकू शकतात. नवल नाही का?
पार्ल्यात जागेची टंचाई आणि महागाई. मग दोन डब्यांचा खर्च करणार कसा? दोन डबे ठेवणार कुठे? पण कार ही जीवनावश्यक वस्तू असल्याने कर्ज काढून ...जागा करून प्रत्येकासाठी एक नग असते.
वास येतो. अस्वच्छता. उंदीर- घुशी येतील म्हणून आपल्या आवारात खत प्रकल्प नको. पण रोज आंघोळ न करून डियोडेरंट वापरणे. रस्त्यावर बिचार्या पक्षी प्राण्यांना शेव बिस्किटे चारा देणे. आणि दिसेल त्या पिंपळाजवल निर्माल्य टाकणे याला पर्याय नाही असे वाटते.
असे प्रॅक्टिकल पार्लेकर असल्याने कचरा व्यवस्थापन रखडणार नाही तर काय?
Wednesday, July 5, 2017
कमीत कमी एवढे करावे
पालिके कडून पार्लेकरांना प्रतिसाद न मिळाल्याने स्वच्छ पार्ले अभियान बंद करायचे का?
अजिबात नाही. कचर्याचे वर्गीकरण केलेच पाहिजे. पालिकेच्या नेहमी येणाऱ्या घंटा गाडी ला फक्त निरुपयोगी कचरा द्या. ओला कचरा आपआपल्या घरी कंपोस्ट करा. अगदीच पर्याय नसेल तरच ओला कचरा देखिल बाहेर पाठवा.
काही झाले तरी सुका कचरा मात्र या गाडीला देऊ नये. इथे आपण चुकतो. 3-5 दिवस सुका कचरा गोळा करून देण्यात यावे. यासाठीच पालिकेतील वेगळी गाडी आहे. सध्या याचे कंत्राट श्री गुणवंत जाधव कडे आहे. पालिकेत त्यांचा फोन नंबर मिळेल. ते आपले काम नियमित करत नाहीत हे मात्र खरे आहे. तरी फोन करुन आठवण केल्यावर येतात.
ओला सुका कचरा वेगळा करणे पुरे नाही. ते वेगळेच द्यावे लागते. आपल्या पर्यावरणासाठी निदान एवढे तरी करू या