कचरा व्यवस्थापनातला पहिला टप्पा म्हंजे
कचर्याचे वर्गीकरण—याला सेग्रेगेशन असे म्हणतात.
सेग्रेगेशन कशासाठी?
वेग- वेगळ्या प्रकारचे पदार्थ वेग-
वेगळ्या पद्धतीने मेनेज करायचे असते. सर्व एकत्र आल्यामुळे त्यांची विलेवाट नीट
होत नाही किंबहुना त्यातून विषारी पदार्थ निर्माण होतात. म्हणून पदार्थांचा प्रकार
बघून त्यांना वेग-वेगळे ट्रीटमेंट केली पाहिजे. ही शास्त्रोक्त आणि योग्य पद्धत
आहे. नाही तर कचरा व्यवस्थापनाच्या पुढच्या प्रक्रियेला काहीच अर्थ राहत नाही.
साधे वर्गीकरण
कचर्याचे सर्वात साधे वर्गीकरण म्हणजे-
ओला आणि सुका असे आहे. ओला म्हणजे सर्व सेंद्रिय पदार्थ असलेला कचरा- त्यात कच्चा
आणि शिजलेला अन्न येत. सुका कचरा म्हणजे इतर सर्व कागद, प्लास्टिक, काचा, मेटल, ई
वेस्ट वगयरे. सर्व साधारण व्यक्तीला असे करणे पुरे वाटते. काही संस्था सुद्धा हेच
सांगतात. कारण सुका कचरा नेवून त्याचे पुढचे वर्गीकरण करण्याचे काम तिथे होत असते.
पण असे करण्य मागचे दुष्परिणाम लक्षात आल्यावर, अजून व्यवस्थित वर्गीकरण करणे
अपरिहार्य असल्याचे पटते...ते असे.
ओला कचरा
कच्चे पदार्थ सहजपणे आणि वास न येता
खतामध्ये बदलतात. पण शिजलेले पदार्थ, मांसाहारी पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थांचे
व्यवस्थापन जास्तं कठीण असते. त्यामुळे ओल्या कचर्याचे या दोन भागात वर्गीकरण करणे
अगदी आयडीयल होईल. तसेच पाळीचे पैड, डायपर, ड्रेसिंग व असे इतर पदार्थांना ‘हानिकारक’
असल्या मुळे तीव्र अग्नीत जाळले जाते- (इंसिनरेशन).
सुका कचरा
पहिले तर ई-वेस्ट म्हणजे इलेक्ट्रोनिक आणि
विजेच्या वस्तू वेगळ्या करणे- कारण त्यांचे प्रमाण कमी असले तरीही त्यातून विषारी
पदार्थ निघून जल, वायू आणि माती प्रदूषित करतात. ते विशिष्ठ प्रक्रियेतून गेल्यावर
हे प्रदूषण टळू शकते. स्वच्छ कागद आणि स्वच्छ प्लास्टिक वेगळे ठेवल्यामुळे त्यांचे
पुनर्निर्माण अगदी सोपे होवून जाते आणि त्यासाठी खूप कमी उर्जेची गरज असते. शेवटी
खराब कागद, खराब प्लास्टिक जसे दुधाच्या पिशव्या, लामीनेट केलेले कागद-पुत्ठे-
यातून बरेच प्रक्रिया केल्या नानातरच काही मिळू शकते. सर्व सुका कचरा एकत्र ठेवल्या
मुळे स्वच्छ कागद, प्लास्टीकही खराब होवून जातात आणि नुकसान होते. आणखीन एक म्हणजे
काचा, थरमाकोल, धातूच्या वस्तू- हे सर्व पुनर्निर्माणसाठी घेतले जातात. यातील काही
माल खूपच खराब असल्या मुळे तो पुरला किव्हा जाळला जातो.
वेड कसले?
पर्यावरणाचा विनाश होवू नये म्हणून
कचर्याचे वर्गीकरण करण्यार्याला फक्त ओला आणि सुका असे करून समाधान मिळणे अशक्य
आहे. वर्गीकरणमागचे विज्ञान समजल्यावर कुणीही समजेल कि वर्गीकरणाचे दोन मार्ग
आहेत- एक सोपा आणि दुसरा योग्य...याला या विषयातील अडाणी जण ‘वेडच’ म्हणतील. पण हे
वेड आजच्या काळाची तातडीची गरज आहे.
तर आदर्श वर्गीकरण म्हणजे
१.
हानिकारक कचरा
२.
मांसाहारी, शिजलेला आणि दुग्धजन्य पदार्थ
३.
बागेतला कचरा, पाने, फुले, फळ, भाज्यांचे भाग
४.
ई वेस्ट
५.
स्वच्छ कागद
६.
स्वच्छ प्लास्टिक
७.
काचा, मेटल, थर्माकोल, रबर इत्यादी
८.
खराब कागद, खराब प्लास्टिक
९.
बांधकाम कचरा
१०. मोठ्या वस्तू
११.
कापडे