Wednesday, July 22, 2015

पार्लेकरांनी संकल्प केला

लकमान्य सेवा संघात शनिवारी  झालेला कार्यक्रम 'घनकाचार्याकडून शून्य कचऱ्याकडे' खूप चांगला झाला.

पार्ल्याकी स्वच्छता सांभाळणारे आणि त्याबद्दल विचार करणारे सर्व उपस्थित होते.  तज्ञांनी पहिल्या भाषणासाठी जास्त वेळ घेतल्या मुले इतर महत्त्वाच्या काही भाषांना वेळ उरला नाही हे मात्र खरे. तरीही कार्यक्रम यशस्वीच म्हणावा, कारण स्वच्छतेचा बीज रुज्ल्याची लक्षणे दिसली. विशेतः भावी पर्लेकारणाचा सहभाग आणि उत्साह बघून खूप आनंद वाटला. आपल्या छोट्या दोस्तांनी सुंदर नातुकालीतून कचर्याच्या व्यवस्थापनाबद्दल खूप चांगली माहिती सांगितली.

एक मोठे रहिवाशी संघ म्हणून विजयनगर सोसाईटी आणि एकाच इमारतीचे देवांगिनी सोसाईटी बद्दल ऐकला मिळाले. या दोन्ही भाषणातून 'शून्य कचरा' प्रकल्प पार्ल्यात करण्यासारखे आहे आणि त्यातून अनेक फायदे आहेत असे समजले.

 वेळेच्या अभावामुळे उपस्थित जनप्रतिनिधी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधता आला नाही. (असा फक्त पार्ल्यातच घडू शकता ना?). निदान पिंपळे साहेबांच काय म्हणणे आहे ते ऐकायची इच्छा होती. असो- असे कार्यक्रम वारंवार होवू देत, म्हणजे हे सध्या होईल.

शेवटी श्री कोलवणकर यांच्या मार्ग्दर्षानाखले उपस्थित पार्लेकरांनी संकल्प केला-..." जोपर्यंत हि भूमाता सुजलाम सुफलाम आहे, जोपर्यंत ती प्रदूषणमुक्त आहे, तोपर्यंत आपण आणि आपल्या पुढील पिढ्या आरोग्यमय जीवन जगतील. घरचे आरोग्य हे बाहेरील सार्वजनिक स्वच्छतेवर अवलंबून असल्यामुळे कचरामुक्ती हे कर्तव्य समजून या 'कचरामुक्त पार्ले' अभियानाला तनमनधनाने हातभार लावण्यास मी बांधील आहे."

Saturday, July 18, 2015

एक प्रस्ताव- पर्लेकारांसाठी

एक पार्लेकर पर्यावरण मित्र, अंड माझे स्नेही अनिकेत करंदीकर यांनी दादरच्या स्त्री मुक्ती संघटने शी संपर्क करून पार्ल्यातील कचर्याची समस्या कशी सोडवावी यावर प्रस्ताव मागवला. स्त्री मुक्ती संघटना हि मुंबईत अनेक ठिकाणी कार्यरत असून, कचरा 'प्रोसेस' करण्यात त्यांनी खास यश मिळवले आहे. हि संस्था सेवाभावी संस्था आहे.

तर त्यांनी दिलेला प्रस्ताव- बायोगासचा आहे. ओळ कचरा या यंत्राने घातल्यावर रोज १०० किलो खात आणि बायो-गस मिळू शकतो. याचा खर्च ३५ लाख पर्यंत येयील आणि यंत्रणा बसवण्यासाठी जागा द्यावी लागेल. भाभा अणुशक्ती केंद्राचे श्री काळे यांच्या संशोधनावर अवलंबून हे प्रकल मांडलेले आहे. सुरु करून २ वर्षात पैसे फेडून येतात, नंतर खात आणि गस मधून मिळणारे पैसे हा फायदाच ठरेल. 

पण मला काही प्रश्न पडलेले आहेत:
1. पार्लेकर आपली सवय बदलू शकतील का? ओला आणि सुक्का कचरा वेगळा करून टाकतील का?
२. हा प्रकल्प पार्ल्यात कुठे उभा करायचा? फ्लायओव्हर खाली? सावरकर बागेत? महंत रोडवरच्या प्लॉटवर?
३. ह्याचे पैसे कोण देणार?
४. हा प्रकल कोण सांभाळणार?

या प्रश्नाची उत्तरे पाहिजेत, आधी कुणी केले आहेत त्यांच्याकडून कल्पना घेवून करता येयील
बघू या काय होतंय आज....... 



Friday, July 17, 2015

नमस्कार, पार्लेकर!

पार्ल्यातली मंडळी आता पर्यावरणाच्या सामसयाबद्दल जागरूक होत आहेत. निदान पालिका आणि पुढारी तरी. यासाठी उद्या, दिनांक १८ जुलै संध्याकाळी ६ ते ८ च्या मध्ये पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघाच्या, गोखले सभागृहात परिसंवाद आयोजित केलेला आहे. पार्ल्यातील कचर्याची विले-वाट या विषयवार चर्चा होईल.

सर्वांनी जरूर या!
सोमवारी  तिथे काय घडले, हे या ब्लॉगवर वाचा

पुन्हा भेटू